Video Story : एका हाती खडू अन् दुसऱ्या हाती मोबाईल...

वर्ग सुरु आहेत मात्र विद्यार्थी नाहीत; आभासी अभ्यासाची न्यारी गोष्ट
Video Story : एका हाती खडू अन् दुसऱ्या हाती मोबाईल...

नाशिक | प्रतिनिधी

कालपासून नाशिकमध्ये शाळा उघडल्या. नवागतांचे स्वागतही दणक्यात झाले. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी १०० टक्के हजेरी मुलांची होती. विश्वास बसत नाहीये का? होय खर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने शाळेचा पहिला दिवस अगदी उत्फूर्तपणे एन्जॉय केला...

राज्यातील सर्वच शाळा ऑनलाईन स्वरुपात सुरु आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी बहुतांश मुलांनी घरातूनच शाळेला हजेरी लावली होती. गेल्या वर्षप्रमाणेच यंदाच्याही शैक्षणिक वर्षाची सुरवात मंगळ्वारपासून ऑनलाइन पद्धतीने झाली.

मागील वर्षी इयत्ता पहिली ते चवथीच्या शालेय विद्यार्थ्याना ऑनलाइन शिक्षणातून वगळ्ण्यात आले होते. परंतू यंदाच्या 2021-22 च्या शैक्षणिक वर्षापासुन या वगार्तील मुलांना देखील ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे.

ऑनलाइन शैक्षणिक सुरु असतानाही मुलांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले. यावेळी काही शाळांमध्ये ऑनलाइनद्वारे मुलांची परेड घेण्यात आली. शिक्षकांकडून शाळेतील पालकांचे मोबाइल क्रमांक घेण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com