विखुरलेली भाऊबंदकी आली एकत्र

नाशिकस्थित सटाण्यातील सोनवणे परिवारचा मेळावा
विखुरलेली भाऊबंदकी आली एकत्र

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने नाशिक शहरात स्थलांतरित झालेल्या सटाणा (Satana) येथील सोनवणे भाऊबंदकीचा एका मेळावा नाशिक (Nashik) शहरात नुकताच पार पडला. या मेळाव्यास तीन पिढ्यांची उपस्थिती लाभली. या मेळाव्यात वाडे, कुट विसरून आपणच आपले भाऊबंद, मित्र आणि आप्तेष्ट अशी शपथ घेण्यात आली. गंगापूर रोड येथील एका हॉटेलच्या सभागृहात हा मेळावा रविवारी (दि २९) रोजी पार पडला. या मेळाव्यास नाशिक शहरातील मूळ सटाणा येथील सोनवणे नागरिक उपस्थित होते...

या मेळाव्यात अध्यक्ष जिभाऊ सोनवणे यांनी मेळाव्याचा उद्देश उपस्थितांना सांगितला. आपल्या गावातील अडचणीत असलेला विद्यार्थी, व्यक्ती यास आपण मदतीचा हात दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष शेखर सोनवणे यांनी एक कुटुंब म्हणून आपण याकडे कसे पहिले पाहिजे याबाबची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्यात जवळपास 40 सदस्यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी प्रत्येकाने आपल्या सूचना मांडल्या तसेच हा उपक्रम असाच सुरु राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. यादरम्यान, एका समूहाला जशी कार्यकारिणीची गरज असते तशीच गरज लक्षात घेऊन नाशिक निवासी सोनवणे परिवाराची कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली.

यावेळी जिभाऊ सोनवणे हे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी शेखर सोनवणे, सचिवपदी हिरामण सोनवणे, खजिनदार किरण सोनवणे, कार्यकारणी सदस्य डॉ संजय सोनवणे व विलास सोनवणे, रमेश सोनवणे, केदा सोनवणे, अरुण सोनवणे व शरद सोनवणे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

सोनवणे परिवाराच्या सदस्यांनी एकत्र येण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. विखुरलेले भाऊबंद आता एकत्र येऊ लागले आहेत. आपण शहरात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलो आता गावाकडच्या हुशार मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हा मेळावा एक स्फूर्ती देणारा ठरेल यात शंका नाही.

डॉ संजय पाटील, सटाणा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com