सरपंचानेच पीपीई कीट घालून केले निराधार करोनाबाधीताचे अंत्यसंस्कार

सरपंचानेच पीपीई कीट घालून केले निराधार करोनाबाधीताचे अंत्यसंस्कार

नाशिक | प्रतिनिधी

सरपंचाने गावातील निराधार असलेल्या आणि करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंसंस्कार केले आहेत. त्यांच्या या पावलामुळे पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. बागलाण तालुक्यातील कौतिकपाडा येथील सरपंच राजू जाधव असे या सरपंचाचे नाव आहे...

बागलाण तालुक्यातील संवेदनशील गाव अशी ओळख असणारे कौतिकपाडा या गावात मीराबाई दातरे यांचे निधन झाले. करोनामुळे निधन झाल्याने या रुग्णाचा अंत्यसंस्कार कसा करणार ही गावाला आणि त्या परिवाराला चिंता असताना स्वतः सरपंच राजू जाधव यांनी पीपीई किट परिधान करून या महिलेचे अंत्यसंस्कार केले.

त्याच दिवशी गावातील निराधार व्यक्ती नथुसिंग लाला पवार यांचेदेखील अपघाती निधन झाले होते. त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाणे, त्यांचे शवविच्छेदन करून त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कौतिकपाडा गावात आणून आता त्यांच्यावर अंत्यविधी कोण करणार असा प्रश्न उपस्थित राहिला होता.

करोनामुळे सख्खे नातेवाईक लांब जातात. हा तर निराधार माणूस होता, गावचे सरपंच या नात्याने जाधव यांनी पुढाकार घेत पाणी देण्यासाठी स्वतः घागर उचलली आणि त्या मृत आत्म्यास पाणी दिले.

आपण सरपंच झालो म्हणजे फक्त राजकारणच करायचं, असे न करता समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणे लागतो या आविर्भावाने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केल्याचे त्यांनी सांगितले.

गावात करोनाचा उद्रेक वाढू लागल्यानंतर सॅनिटाझर घराघरांत दिले गावाला निर्जंतुक केले. फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायततिला कायमस्वरूपी पंप खरेदी केला, मराठी शाळेत दोन खोल्या विलगीकरण कक्ष तयार केले, शासनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com