सारथी तारादूतांचा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

सारथी तारादूतांचा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

मटाने | वार्ताहर Matane

सारथी (Sarathi Maharashtra) ही संस्था कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात असते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सारथी संस्थेचे महत्त्व समाजाला समजले. मंत्रिमंडळ स्थरावरून काही निर्णय पण झाले. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होते याकडे लक्ष लागले आहे. आज नुसतेच सारथी संस्थेच्या तारादूतांनी 'तात्काळ नियुक्ती' मिळावी या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलनासाठी निवेदन दिले आहे...(Atmklesh Agitation)

छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे (Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI), Pune) अंतर्गत मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी तारादूत प्रकल्पाची निर्मिती झाली.

राष्ट्रपती राजवटमध्ये प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर तारादूतांनी वेळोवेळी आंदोलनं केली. छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा सारथी संस्थेच्या प्रमुख मागण्यांमध्ये तारादूत प्रकल्पाची मागणी केली.

१९ जून रोजी मा. अजित पवार (Ajit Pawar), छत्रपती संभाजी राजे (Chatrapati Sambhaji Raje), मराठा क्रांती मोर्चा समन्वयक(Maratha Kranti Morcha), तारादूत प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.

पवार यांनी सारथी संस्थेच्या १३ मागण्यांपैकी सारथी तारादूत प्रकल्प चालू करण्याच्या सूचना संचालक मंडळाला दिल्या.

परंतू, सूचना देऊन १६ दिवस उलटूनही अद्यापर्यंत प्रकल्पाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे तारादूतांवर दीड वर्षापासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता तारादूतांना नियुक्त्या न मिळाल्यास १५ जुलै पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलन विविध मराठा संघटना यांच्यासोबत करणार असल्याचे निवेदन मेल द्वारे सारथी कार्यालयाला दिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com