सप्तशृंगी गडावर किर्ती ध्वजाची परंपरा कायम; वाचा सविस्तर

सप्तशृंगी गडावर किर्ती ध्वजाची परंपरा कायम; वाचा सविस्तर

सप्तशृंगगड | वार्ताहर Saptshrungi Gad

राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर नवरात्रात सप्तशृंगीचे दर्शन (Saptshrungi Gad) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. भाविक व ग्रामस्थांनी (Devotee and villagers) जल्लोषात ध्वज मिरवणूक काढत कीर्तीध्वजाची परंपरा (Kirtidhwaja Parampra) कायम ठेवली...

समुद्र सपाटीपासून ४ हजार ५०० फुट उंचीवर सप्तशृंगगड (Saptshrungi Gad) आहे. वर्षभरातून चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव (Navratrotsav 2021) विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकविले जाते.

दरेगाव (Daregaon) येथील गवळी परिवार (Gawali Family) या ध्वज लावण्याचे मानकरी असुन गेल्या कित्येक वर्षापासुन हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हा परिवार करत आहे. या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही सरळ शिखरावर जाणे म्हणजे मुत्युला आंमञण देणे असे आहे.

पण कसलीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षापासुन गवळी परिवाराकडून केले जाते. डोळयाचे पारणे फेडणाराच हा सोहळा असतो. कोविड-१९ असल्यामुळे अत्यंत साधेपणाने ध्वज मिरवणूक पार पडली.

या ध्वजाची विधीवत पुजा देवी संस्थानचे विश्वस्त मनज्योत युवराज पाटील, सप्तशृंगी गड सरपंच रमेश पवार,पोलीस निरीक्षक समाधान नागरे व पोलीस पाटील शशिकांत बेनके यांच्या हस्ते करण्यात आली.

मध्यरात्री गवळी परीवार शिखरावर जाऊन तेथील पुजा विधी करण्यासाठी १० फुट लांब काठी, ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज, पुजेसाठी गहु, तादुळ, कुंकु, हळद तसेच झेंडा घेवून जाणाऱ्या मार्गातील विविध ठिक ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य आदिसह साहित्य घेऊन जावे लागते.

मात्र राज्यातील कोरोना संदर्भीय परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत साधेपणाने सायंकाळी ६;३० वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहचून गवळी परिवार देवीसमोर नतमस्तक होवून पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाले होते.

प्रसंगी देवस्थानचे एकनिष्ठ विश्वस्त दीपक पाटोदकर, देवी संस्थंचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, राजेश गवळी, संदिप बेनके, अजय दुबे, गणेश बर्डे, रामप्रसाद बत्तासे,प्रकाश कडवे, शांताराम सदगीर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com