नाशिक । प्रतिनिधी

महसूल खात्याने नाशिक विभागाला चालू आर्थिक वर्षासाठि दिलेल्या गौण खनिजच्या ७२८ कोटी २८ लाख रुपयांच्या वसूलीचे उदिष्ट दिले असून मागील दहा महिन्यात अवघी ३७५ कोटी ९८ लाखांची वसुली झाली आहे. मार्च अखेरला अवघे ५० दिवस शिल्लक असून उर्वरीत ३५२ कोटी ३० लाखांचा महसूल गोळा करताना प्रशासनाला घाम गाळावा लागणार आहे. दरम्यान वसुलीत विभागात धुळे जिल्हा प्रथम तर नाशिल जिल्हा दुसर्या स्थानावर आहे....

करोना संकटामुळे शासनाच्या तिजोरित खडखडाट असून महसूल विभागाने वसुलीवर फोकस केला आहे. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, नगर, धुळे व नंदूरबार या पाच जिल्ह्यांना गौण खनिज वसुलीचे ७२८ कोटी २८ लाखांचे उदिष्ट देण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्याने २२९ कोटी उदिष्टापैकी १२५ कोटीची वसुली केली असून तब्बल १०४ कोटींची वसूली होणे बाकी आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी वसुलीचा वेग वाढवा अशा सूचना दिल्या आहेत.

नाशिक प्रमाणेच धुळे,नंदूरबार,जळगाव,अहमदनगर या जिल्ह्यांच्या महसूल वसूलीचे काम कासव गतीने सुरु आहे. धुळे जिल्ह्याला ७१ कोटी ५१ लाख महसूल वसुलीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ३८ कोटी ६२ लाख वसुल झाले असून ३२ कोटी ८९ लाख वसुली होणे बाकि आहे.

नंदूरबार जिल्ह्याला ५३ कोटी ४२ लाख महसूल वसुलीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी २६ कोटी ९५ लाख वसुल झाले असून २६ कोटी ४७ लाख वसुली होणे बाकी आहे. जळगाव जिल्ह्याला १८५ कोटी ६ लाख महसूल वसुलीचे उद्दीष्ट होते.

त्यापैकी ९२ कोटी ८३ लाख वसुल झाले आहे. तर अहमदनगर जिल्ह्याला १८९ कोटी २९लाख महसूल वसुलीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ९२ कोटी ३ वसुल झाले असून ९७ कोटी २६ लाख वसुली होणे बाकि आहे. नाशिक विभागाला दिलेल्या एकुण ७२८ कोटी २८ लाख रुपयांच्या उद्दीष्टांपैकी ३७५ कोटी ९८ लाख रक्कम वसुल झाली आहे.