
नाशिक | प्रतिनिधी
ऑनलाइन रोलेट जुगाराचे आमीष दाखवून युवकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तसेच काही युवकांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या कैलीसंशयितांविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत...
संशयितांविरोधात नाशिक ग्रामीणमध्ये २ व इतर पोलीस ठाण्यांमध्ये ५ हून अधिक वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
राेलेट जुगारात पैसे हरल्याने, कर्जबाजारी झाल्याने त्र्यंबकेश्वर येथील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणातील मुख्य संशयित कैलास शाह याच्यासह इतर संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. यातील संशयितांकडून पोलिसांनी रोलेटसाठी लागणारे, संगणक, युजर्स आयडीसह इतर मुद्देमाल जप्त केला.
संशयित संघटीत पद्धतीने गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सुरुवातीस युवकांना जुगारात परताव्याचे आमीष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित केले जाते. त्यानंतर पैसे हरल्यास पुन्हा जास्त पैसे गुंतवण्याचा दबाव आणून युवकांना कर्जबाजारीही केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे काही युवकांनी आत्महत्या केली. त्यामुळे या गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस कठोर पावले उचरण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार या गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यास ग्रामीण पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.