नाशिककरांनो जागते रहो! अपार्टमेंटमध्ये शिरून चोरट्यांचा डल्ला

नाशिककरांनो जागते रहो! अपार्टमेंटमध्ये शिरून चोरट्यांचा डल्ला

नाशिकरोड | प्रतिनिधी Nsahikroad

बंद दरवाज्याची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन (Robbery) नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....(Robbery at Nashikroad area)

येथील चेहडी (Chehedi) परिसरातील भगवा चौक (Bhagava Chauk) येथील साई आदेश अपार्टमेंटमध्ये राहणारे शशिकांत विष्णुपंत गायके यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट त्याचप्रमाणे 15 ग्रॅम वजनाचे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मंगळसूत्र पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओम पान व कानातल्या बाळ्या असा ऐवज चोरून नेला.

चोरी झाल्याची घटना गायके यांच्या लक्षात येताच त्यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशन गाठले व अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.

याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com