खुशखबर! दिंडोरीत होणार लशीची निर्मिती

रिलायन्स लाईफ सायन्सकडून नाशकात पाहणी
खुशखबर! दिंडोरीत होणार लशीची निर्मिती
लस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रिलायन्स उद्योग समूहाच्या (Reliance Industries) रिलायन्स लाईफ सायन्स कंपनीकडून (Reliance Life Science) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यात लसनिर्मिती प्रकल्प (Vaccine project) सुरु करण्याच्या तयारीत आहे. याद्वारे सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून अडीच हजार रोजगार यानिमित्ताने उपलब्ध होणार आहेत.

या गुंतवणुकीबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभष देसाई (Industrial Minister Subhash Desai) यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

यावेळी, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन तसेच रिलायन्स लाईफ सायन्सचे प्रमुख के व्ही सुब्रमण्यम, सीईओ विनय रानडे, दिनेश साठे, रामा प्रसाद, ज्ञानेश्वर पाटील आदि उपस्थित होते.

प्लाझ्मा प्रोटीन्स, यांसह विविध औषधे निर्मितीत रिलायन्स लाईफ सायन्स कंपनी काम करते. सध्या मुंबईमध्ये कंपनीचा मोठा प्रकल्प आहे, आगामी काळात दिंडोरीत कंपनी गुंतवणूक करणार असल्याने नाशिकारांसाठी आनंदाची बातमी आहे.

कंपनीने याआधीदेखील नाशिकमध्ये पाहणी केली असून नाशिकचे आल्हाददायक वातावरण कंपनीसाठी अनुकूल असल्याचे बोलले जात असल्याची प्रतिक्रिया सीआयआयचे सुधीर मुतालिक यांनी दिली.

तर एमआयडीसीकडून (MIDC) सांगण्यात आले की, कंपनी नाशकात प्रकल्प स्थापन करण्यासाठी उत्सुक असून लवकरच याबाबतची माहिती समजणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com