नाशिकमधील 'या' हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा रुग्णाच्या नातलगांकडून तोडफोड

नाशिकमधील 'या' हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा रुग्णाच्या नातलगांकडून तोडफोड
USER

नाशिकरोड | प्रतिनिधी

येथील दुर्गा गार्डन समोर असलेल्या रेडिएन्ट हॉस्पिटलमध्ये एका करोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. या घटनेप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेत हॉस्पिटलमध्ये असलेल्या दरवाजाची काच फोटून एक नर्स जखमी झाली.

दरम्यान, गेल्या महिनाभरात या हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाल्याचा दुसरा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नाशिक रोड रेडियन्ट हॉस्पिटल मध्ये येथील शिवाजी नगर जनमतनगर जेलरोड राहणारे पोपट दामू गोतीसे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

परंतु त्यांची प्रकृती मध्यरात्रीच्या सुमारास अधिक खालावली. त्यानंतर तातडीने रुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोपट गोतीसे यांचे निधन झाले.

मात्र, नातेवाईक शाम गोतीसे व ज्ञानेश्वर गोतीसे यांनी योग्य उपचार न दिल्याचा आरोप करून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद, शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

यामध्ये रुग्णालयाच्या दरवाजा व इतर सहित्य तुटले व रुग्णालयाची काचा फोडल्याने ही काच सिस्टर तबसुम यांना लागली व त्या जखमी झाल्या.

यावेळी रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तातडीने उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस तसेच नियंत्रण कक्षाकडून अतिरिक्त पोलिस दल या ठिकाणी पाठवण्यात आले त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मात्र रेडियंट हॉस्पिटलचे डॉ. अनिकेत कड यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचा मार्गदर्शना खाली सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com