नाशिक शहरात पावसाच्या हलक्या सरी
नाशिक

नाशिक शहरात पावसाच्या हलक्या सरी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

काल जोरदार हजेरी लावल्यानंतर मंगळवारी (दि.३०) मात्र पावसाने नाशिककरांची निराशा केली. दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

मोसमी वारे राज्यभर सक्रिय झाले असून पुढील एक दोन दिवस राज्यात विशेषकरुन मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रातही पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

हा अंदाज खरा ठरवत सोमवारी शहरात ४० मिलीमीटर इतका पाउस पडला. तब्बल दहा ते पंधरा दिवसानंतर पावसाचे आगमन झाले होते.

वातावरणातील उकाडा नाहिसा होऊन गारवा निर्माण झाला. मात्र मंगळवारी पावसाने नागरिक व बळिराजाची निराशा केलि. दिवसभर हलक्या सरी कोसळल्या.

Deshdoot
www.deshdoot.com