पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयाच्या शुल्कात कपात

पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयाच्या शुल्कात कपात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) शासन निर्देशानुसार संलग्न महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे...

पुणे, अहमदनगर व नाशिक (Pune, Nashik & Ahemadnagar) जिल्ह्यांतील सुमारे ६५० महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणते व किती शुल्क आकारावे व कोणते आकारू नये, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शासन आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुधाकर जाधव (Dr Sudhakar Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. डॉ. व्ही.बी.गायकवाड (Dr V B Gaikwad) व डॉ. संजय चाकणे (Dr Sanjay Chakane) हे या समितीचे सदस्य होते. या समितीने दिलेल्या अहवालानंतर विद्यापीठाने शुल्ककपातीचा निर्णय जाहीर केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com