मनोरुग्ण महिला दुसऱ्यांदा गर्भवती; नाशिक जिल्ह्यातील प्रकाराने सर्वत्र संताप

मनोरुग्ण महिला दुसऱ्यांदा गर्भवती; नाशिक जिल्ह्यातील प्रकाराने सर्वत्र संताप

आहुर्ली | वार्ताहर Ahurli

दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढलेल्या घटना कानावर येतात. असेच एक घृणास्पद कृत्य त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडले आहे. मनोरुग्ण असलेली महिला (Psychiatric woman) दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीतून संताप व्यक्त केला जात आहे....(nashik news Psychiatric woman pregnant crime trimbakeshwar)

यापूर्वीदेखील या मनोरुग्ण महिलेने (Psychiatric woman) एका मुलाला जन्म दिला होता. याबाबत श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी भगवान मधे(Bhagwan Madhe) यांनी प्रसारमाध्यमाद्वारे समाज व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तालुक्यातील देवगाव (Devgaon) येथील एक महिला गेल्या कित्येक दिवसापासून वेडसर झालेली असुन निराधार अवस्थेत इकडे तिकडे भटकंती करत असते.

या मनोरुग्ण महिलेकडे (Psychiatric woman) तिच्या कुंटुबानेही पाठ फिरवली आहे. या वेडसर महिलेच्या वेडेपणाचा फायदा उठवत कुणीतरी अज्ञात एक वा अनेक व्यक्ती या महिलेचे शारिरीक शोषण करत आहेत. यातुन ही महिला सध्या गर्भवती असल्याची माहिती मधे यांनी दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी ही सदर महिलेला गर्भधारणा झाली होती व अपत्य प्राप्ती ही झाली होती. ही महिला अपत्य सांभाळु शकत नाही हे लक्षात घेऊन एका जि.प.शिक्षकाने या अपत्यास दत्तक घेऊन मायेचे छत्र दिले आहे.

दुसऱ्यांदा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली असुन या संतापजनक घटनेबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आरोग्य सुविधेपासून वंचित ठेवणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई करा

देवगाव येथील एक मुलगी गेल्या १० वर्षांपासून वेडसर झाली आहे. याचा गैरफायदा घेत अज्ञात लोकांनी तिच्यावर अत्याचार केले. यातून तिला गर्भधारणा झाली आहे. हे दुसऱ्यांदा घडते आहे. दरम्यान याबाबत गावातील आरोग्य व बालविकास प्रशासनातील अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आदीचींही जबाबदारी आहे. या कर्मचाऱ्यांनी या संतापजनक घटनेकडे दुर्लक्ष केले आहे.

भगवान मधे, सामाजिक कार्यकर्ता

Related Stories

No stories found.