खासगी कोचिंग क्लासेस संघटनेचा ठिय्या; क्लासेस सुरु करण्याची मागणी

खासगी कोचिंग क्लासेस संघटनेचा ठिय्या; क्लासेस सुरु करण्याची मागणी

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या पंधरा महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने, त्यासंबंधीत संचालक, शिक्षक, कर्मचारी या सर्वांचे प्रचंड आर्थिक हाल चालू आहेत. शाळा कॉलेजमधील शिक्षकांना नियमित वेतन चालू आहे.

सरकारने मॉल्स, मंगलकार्यालये, दुकाने व ऑफीसेस चालू केली. पण व्यावसायिक असून शासनाने अद्याप परवानगी न दिल्याने क्लासेस संचालक कुचंबणा सहन करत आहेत. ऑनलाईन समजत नसल्याने व ९ वी ते १२ वी, इंजिनिरींग व स्पर्धापरिक्षा देणार्‍या मोठ्या विद्यार्थ्यांची व पालकांची मागणी आहे.

कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करायला तयार असूनसुद्धा कमी विद्यार्थी संख्येने क्लासला परवानगी द्यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हुतात्मा स्मारक येथे, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शहर व जिल्ह्यातील बहुतांश क्लासेससंचालक यावेळी उपस्थित होते. अनेक क्लासचालक शिक्षकांचे कोरोनाने निधन व काहींनी आर्थिक तंगीने केल्या आत्महत्या केल्या आहे. काहींचे, कर्जबाजारीपण, उपासमारीने प्रचंड हाल होत आहे.

सरकार काही मदतही करत नाही. जगावे कसे या शिक्षकांनी? पॉझिटीव्हीटी रेट कमी होऊनसुद्धा परवानगी देण्यास विलंब का होत आहे. पुणे, नागपूर, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यांनी परवानग्या दिल्या​असताना, नाशिकला उशीर का?

अनेक वेळेला निवेदने देऊनसुद्धा दुर्लक्ष का केले जात आहे असे संतप्त प्रश्न आंदोलकांकडून विचारण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, प्रकाश डोशी, उपाध्यक्ष अरुण कुशारे, विवेक भोर, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, कैलास देसले, लोकेश पारख, रविंद्र पाटील, सचिन जाधव, पराग घारपुरे, सचिन अपसुंदे, विष्णू चव्हाण, प्रमोद गुप्ता, सचिन शिंदे, किशोर डोंगरे, राहूल चौधरी, संतोष पवार, अमिर शेख, दिनेश राठोड, प्रमोद गुप्ता, धनंजय ढाकणे, दत्ता नेरकर, सागर सानप, महेश भोरे यांच्यासह अनेक क्लासेस संचालक आंदोलनात सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com