आता पूर्व प्राथमिक ही ‘ऑनलाइन’
नाशिक

आता पूर्व प्राथमिक ही ‘ऑनलाइन’

नव्या सूचना जाहीर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

कराेना संकटामुळे शाळा प्रत्यक्षात सूरू करणे शक्य नसल्याने १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाईन शाळा भरविल्या जात आहेत.

सुरुवातीला शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सूचनांमध्ये पूर्वप्राथमिक ते दुसरी पर्यंतच्या वर्गाना ऑनलाईन शिक्षण देण्यात येेऊ नये असा निर्णय होता. आता त्या निर्णयात बदल करण्यात आला असून पूर्वप्राथमिक ते दुसरी पर्यंतच्या ऑनलाइन वर्ग सुरू केले जाणार असून त्याची वेळही ठरवून देण्यात आली आहे.

पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणाचे हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

याबाबत शिक्षण विभागाने नवीन परिपत्रक जाहीर केले असून पूर्व प्राथमिक, इयत्ता पहिली, दुसरीसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत वेळापत्रकात माहिती दिली आहे. त्याशिवाय ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी-शिक्षक यांच्याबरोबर आता पालकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे.

पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी कशा स्वरुपात आणि किती वेळ घ्यावे याबाबत सूचना दिल्या आहेत. यापूर्वी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्यासंदर्भात अंदाजे तारखा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याचेही आदेश दिले होते. परंतु आता त्यात काही बदल केले असून अतिरिक्त सूचना शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत.

सुधारित वेळापत्रक आणि स्वरूप

इयत्ता : वार : ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी : शिक्षणाचे स्वरूप

पूर्व प्राथमिक : सोमवार ते शुक्रवार : प्रत्येक दिवशी ३० मिनिटांपर्यंत : पालकांशी संवाद आणि त्यांना मार्गदर्शन

पहिले ते दूसरी : सोमवार ते शुक्रवार : प्रत्येक दिवशी ३० मिनिटांची दोन सत्र : १५ मिनिटे -पालकांशी संवाद आणि त्यांना मार्गदर्शन. १५ मिनिटे - विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण

तिसरी ते आठवी : प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रांपर्यंत : विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

नववी ते बारावी : प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची चार सत्रांपर्यंत : विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

Deshdoot
www.deshdoot.com