पावसाचा शिडकावा; अर्ध्या नाशकात बत्ती गुल

पावसाचा शिडकावा; अर्ध्या नाशकात बत्ती गुल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे अर्ध्या नाशकात बत्ती गुल (Power Off) झाली आहे. पावसाळापूर्व कामे पूर्ण करूनही वीज वितरण कंपनीचा (MSEB) भोंगळ कारभार आज चव्हाट्यावर आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात पाऊस उघडून १५ ते २० मिनिटांचा कालावधी लोटला तरीदेखील अद्याप याठिकाणी लाईट आलेली नव्हती....

आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास तुरळक पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना पावसाने सुखद धक्का दिला. मात्र, याच वेळी बत्ती गुल झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार एमजीरोड परिसरापासून कॅनडा कॉर्नरपर्यंत लाईट गेल्याने महावितरणविरोधात रोष व्यक्त केला आहे. (Rain in Nashik)

एरव्ही लाईट जाणार असल्याची पूर्वसूचना महावितरण मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे पाठवतात. मात्र कुठलीही पूर्वसूचना वजा संदेश न पाठवता लाईट गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com