विद्यार्थी प्रिय शिक्षक वि. भा. देशपांडे यांचे निधन

विद्यार्थी प्रिय शिक्षक वि. भा. देशपांडे यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पेठे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विद्यार्थी प्रिय शिक्षक वि. भा. देशपांडे यांचे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते...

काही दिवसापूर्वीच त्यांच्या पत्नीचे आणि थोरल्या मुलाचे करोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनाही करोनाची बाधा झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे गणित आणि विज्ञान हे विषय ते मनापासून शिकवत होते. सरांचे बोलणे, शिकवण्याची पद्धत विद्यार्थीप्रिय होती गणित आणि विज्ञान या विषयांचे उत्तम शिक्षक अशी त्यांची ख्याती नेहमीच स्मरणात राहील.

वि. भा. देशपांडे सर पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com