'स्मार्ट सिटी' हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे; आधी पार्किंग महत्वाची, जंक्शनचे नंतर पाहू

नागरिक, व्यावसायिकांना विश्वासात न घेता 'स्मार्ट' मनमानी; रविवार कारंजाचा नेहरू चौक होऊ नये
'स्मार्ट सिटी' हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे;  आधी पार्किंग महत्वाची, जंक्शनचे नंतर पाहू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या चार दिवसांपासून स्मार्ट सिटी (Smart City) अंतर्गत जंक्शन विकासासाठी (Junction Development) ट्रायल रन (Trial Run) सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार कारंजा (Ravivar Karanja) येथे ही रन घेण्यात येत असल्याचे अतोनात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. येथील नागरिक व व्यावसायिकांना विश्वासात न घेता स्मार्टसिटीकडून काम केले जात असल्याचा आरोप करत रविवार करंजाचा नेहरू चौक होऊ नये असे फलक आता याठिकाणी झळकवले जात आहेत...

येथील ट्रायल रन त्यामुळे वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला असून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यातच व्यापारी महासंघाने तीव्र निषेध नोंदवत आज सकाळी (दि.१५) रोजी स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Sumant More smart city ceo nashik) यांच्या भेटीसाठी ते निघाले आहेत.

दरम्यान, शहरातील जुनी बाजारपेठ असलेल्या या रविवार कारंजाची मुख्य समस्या ही पार्किंगची आहे. येथे असलेल्या यशवंत मंडई (yashwant mandai) येथे प्रस्तावित वाहनतळ आहे; त्याचे काम प्राधान्याने करायचे सोडून नवनवीन प्रकल्प हाती घेतला जात आहे.

या जंक्शन विकास नावाच्या स्मार्ट सिटीच्या कामातून रविवार कारांजचे वाटोळे आम्हाला करायचे नाही. शहराच्या स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतला असता रविवार कारांजवर कोणतेही काम व्यावसायिकांना विश्वासात घेतल्याशिवाय करू देणार नाही अशा पावित्र्यात येथील नागरिक आणि व्यावसायिक असल्यामुळे स्मार्ट सिटीचे हे काम कसे पूर्ण होणार याकडे लक्ष लागून आहे.

या कारंजाची गरज पार्किंगची आहे. त्यामुळे यशवंत मंडईत बहुमजली पार्किंगची सोय प्राधान्याने करावी. यानंतर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी निघेल.

यानंतर तुम्हाला कारंजाचा जसा विकास करायचा तसा करा असे येथील नागरिक व व्यावसायिकांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com