मनमाड, नाशिकची जीवनवाहिनी पंचवटी एक्स्प्रेस  रद्द
पंचवटी एक्सप्रेस

मनमाड, नाशिकची जीवनवाहिनी पंचवटी एक्स्प्रेस रद्द

नाशिक I प्रतिनिधी

मागील वर्षाच्या ताळेबंदीनंतर रेल्वे प्रशासनाने काही विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता काही रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने रेल्वे प्रशासनाने ये-जा करणाऱ्या पाच गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये मनमाड, नाशिकची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचा देखील समावेश असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होण्याची शक्यता व्यक्त होते...

दररोज सकाळी मनमाडहून सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस अल्पप्रतिसादामुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज मनमाड, नाशिकहून मुंबईला कामाच्या निमित्ताने हजारो नागरिक या एक्स्प्रेसवर ये-जा करतात. त्यामुळे अचानक ही ट्रेन बंद झाल्यामुळे आता दररोज कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे.

रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांची यादी पुढीलप्रमाणे

1).ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मनमाड विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

2) ट्रेन क्रमांक 02110 मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

3).ट्रेन क्रमांक 02113 पुणे -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

4).ट्रेन क्रमांक 02114 नागपूर -पुणे विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 09.05.2021 पर्यंत रद्द

5).ट्रेन क्रमांक 02189 मुंबई -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

6)ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

7) ट्रेन क्रमांक 02111 मुंबई -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

8) ट्रेन क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

9) ट्रेन क्रमांक 02271 मुंबई -जालना विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

10) ट्रेन क्रमांक 02272 जालना -मुंबई विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द असल्याचीप्रवाशांनी नोंद घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com