संतप्त नागरिकांचा पंचवटी पोलीस ठाण्यासमोर 'ठिय्या'

संतप्त नागरिकांचा पंचवटी पोलीस ठाण्यासमोर 'ठिय्या'

पंचवटी | वार्ताहर Panchvati

नाशिक बाजार समितीत (Nashik APMC) कामकाज आटोपून मंगळवारी (दि.२३) रात्री उशिरा पेठरोडवरून घरी जाणाऱ्या भाजीपाला व्यापारी (Vegetable merchant) राजेश वकील शिंदे यांची पाच ते सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली....

पोलिसांनी संशयित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शासन करीत न्याय मिळावा यासाठी गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलीस ठाण्यावर (Panchvati Police Station) मयत शिंदे यांचे नातेवाईक व भराडवाडी परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन (Thiyya Agitation) करीत मागण्यांचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

मयत शिंदे यांचे नातेवाईक सकाळ पासून पंचवटी पोलीस ठाण्यात जमले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर हे सर्व नागरिक पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळ तासभर बसून आपला आक्रोश व्यक्त करीत होते.

यावेळी त्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजेश शिंदे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी. हा खून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून, सरकारी वकील देण्यात यावेत.

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन, न्यायचे राज्य स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच राजेश शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांचे कर्ता पुरुष व आधारस्तंभ होते. त्यामुळे शासनाने त्यांना १० लाख रुपयांची मदत करावी असे या निवेदनात म्हटले आहे.

उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी संतप्त नागरिकांचे निवेदन स्वीकारत या प्रकरणातील संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले. दुपारी दीड वाजेपर्यंत हा जमाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळ बसून होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com