नाशिकच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी; मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत

नाशिकच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी; मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत

नाशिक | प्रतिनिधी

ऑक्सिजन गळतीदरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाख तर नाशिक मनपा 5 लाख अशी एकूण दहा लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

Title Name
नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती
नाशिकच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी; मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत

आज दुपारी नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने जवळपास २२ रुग्णांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा अधिक रुग्ण अत्यवस्थ आहेत. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतांच्या नातेवाईकांशीदेखील भुजबळ यावेळी बोलले. या घटनेने शोकमग्न झालेल्या भुजबळ यांनी मृतांच्या नातलगांना धीर देत सर्वोतपरी मदत करण्याचा शब्द दिला. यावेळी ते म्हणाले, नाशिक महापालिकेकडून मृतांच्या नातलगांना ५ लाख आणि राज्य सरकारकडून पाच लाख असे दहा लाखांची मदत प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला केली जाणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत

हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com