Exclusive : ऑक्सिजन एक्स्प्रेसमधील सर्व टँकर्स उतरणार नाशिकला

या एक्स्प्रेसमधून १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होणार
Exclusive : ऑक्सिजन एक्स्प्रेसमधील सर्व टँकर्स उतरणार नाशिकला

नाशिक | प्रतिनिधी

विशाखापट्टणहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस उद्या (दि २४) सकाळी नाशिक शहरात पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसवरील सर्वच्या सर्व ७ टँकर्स नाशिकमध्ये उतरवले जाणार आहेत. याबाबतची माहिती रेल्वे स्टेशन मास्टर आर. के. कुठार यांनी 'देशदूत'शी बोलताना दिली...

राज्यात करोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयातून रुग्ण इतरत्र हलविण्यात आले आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे तुटवडा भरून काढणे प्रशासनाच्या नाकेनऊ आले आहे.

रेल्वेद्वारे महाराष्ट्रासाठी रोल ऑन रोल म्हणजे रोरो पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. नवी मुंबईच्या कळंबोली रेल्वे स्थानकातून १८ एप्रिलला रात्री ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला निघाली होती.

आता या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्समध्ये ऑक्सिजन भरण्यात आला असून विशाखापट्टणमच्या स्टील प्लांटमध्ये ऑक्सिजनचे हे टँकर्स भरण्यात आले आहेत. ही एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली आहे. आज रात्री ९ वाजेपर्यंत ही एक्स्प्रेस नागपुरात दाखल होईल. त्यानंतर नाशिकला उद्या (दि २४) रोजी सकाळी १० वाजता ही एक्प्रेस पोहोचणार आहे.

याठिकाणी एक कंत्राटदार नेमण्यात आला असून त्याच्या माध्यमातून ऑक्सिजन कमतरता असलेल्या ठिकाणी हे टँकर्स पोहोचवले जाणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com