नाशिककरांनो काळजी घ्या! अकरा दिवसांत साडेचारशेवरून रुग्णसंख्या पोहोचली साडेसहा हजारावर

नाशिकमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
नाशिककरांनो काळजी घ्या! अकरा दिवसांत साडेचारशेवरून रुग्णसंख्या पोहोचली साडेसहा हजारावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नववर्षाची सुरुवात करोनाच्या तिसऱ्या लाटेने (Covid 19 third phase) झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढतच चालली आहे. लसीकरण (Vaccination) अधिक प्रमाणात झाले असल्याने क्रिटीकल अवस्थेत (Critical Condition) जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली तरीदेखील बाधितांची संख्या मात्र दररोज हजारीपार गेली आहे....

नाशिक जिल्ह्यातील विविध दवाखान्यांत (Various hospitals in Nashik) सद्यस्थितीत ६ हजार ३२५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) देण्यात आली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागात नाशिक तालुक्यात २१७, बागलाणमध्ये ३७, चांदवडमध्ये २५, देवळयात २४, दिंडोरीत १५७, इगतपुरी ८७, कळवण २९, मालेगाव १५, नांदगाव ६४, निफाड ३०६, पेठ ०२, सिन्नर ११४, सुरगाणा ०६, त्र्यंबकेश्वर २४ व येवलयात २४ असे एकूण १ हजार १३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ८९६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६५ तर जिल्ह्याबाहेरील २३३ रुग्ण असून असे एकूण ६ हजार ३२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

काल नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक तालुक्यात ५३, बागलाण ०९, चांदवड ०८, देवळा ०७, दिंडोरी ३७, इगतपुरी २६, कळवण १९, मालेगाव १०, नांदगाव ४९, निफाड ९१, पेठ ०१, सिन्नर २१, सुरगाणा ०४, त्र्यंबकेश्वर १०, येवला ०५ असे एकूण ३५० पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

तर नाशिक मनपा क्षेत्रात (NMC) १ हजार ३८, मालेगाव मनपा क्षेत्रात (MMC) १४ तर जिल्हा बाह्य ४८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. दुसरीकडे नाशिक ग्रामीणमध्ये ४ हजार २५१ मृत्यू करोना संसर्गाने नोंदविण्यात आले आहेत.

तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com