लस आली रे! जिल्ह्याला आज लाखभर लशी प्राप्त

चार महिन्यात पहिल्यांदा एवढ्या लस प्राप्त
लस आली रे! जिल्ह्याला आज लाखभर लशी प्राप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्याला आज दिवसभरात १ लाख ३ हजार ७०० लस प्राप्त झाल्या असून यात ९२ हजार कोव्हीशिल्ड (Covishield) तर ११ हजार ७०० कोवॅक्सिन (covaxin) लस आहेत. महापालिकेला यापैकी २८ हजार लस मिळणार असून यामध्ये २३ हजार कोव्हीशिल्ड तर ५ हजार कोवॅक्सिन लस आहेत. चार महिन्यात पहिल्यांदा एवढ्या लस प्राप्त झाल्या असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.... (Health department Nashik)

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणे अपेक्षित आहे. मात्र, कधी लस उपलब्ध होत नाही तर कधी लस उपलब्ध असताना नियोजनाचा अभाव असल्याने लसीकरण होत नाही. गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात लसीकरणाचा वेग मंदावला होता .मात्र, लस प्राप्त झाल्याने आता लसीकरण सुरळीत होणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

काराेनाचा (Covid 19) प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या वतीने नागरिकांना काराेना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन केले जात आहेत. मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पालिकेला पुरेशा लसच उपलब्ध हाेत नसल्याने लसीकरणावर परिणाम हाेत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी प्रमाणात लसीकरण (Vaccination) होत आहे. परिणामी, लसीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत हाेता. दरम्यान, शुक्रवारी सांयकाळी जिल्ह्याला तब्बल १ लाख ३ हजार लस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com