कळवण : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, तीन जखमी

कळवण : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, तीन जखमी

कळवण । प्रतिनिधी

तालुक्यातील मानूर शिवारात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

यापैकी एका जखमीस अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. कळवण शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या मानूर शिवारातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर दोन भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की दोघेही दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अल्टो कारवर जाऊन धडकले. या तिहेरी अपघातात दत्तात्रेय आप्पा पवार (रा गोसराणे हल्ली मुक्काम कळवण) येथील रहीवाशी हा ठार झाले.

तर तेजस प्रकाश कापडणीस, गणेश विनायक कापडणीस राहणार आसखेडा ता सटाणा व दिपक दादाजी पाडवी रा जयपूर ता कळवण हे तिघे जखमी झाले आहेत.

दिपक पाडवी यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. तर तेजस कापडणीस व गणेश कापडणीस ह्या दोघांना सटाणा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

याबाबत अल्टो मालक संदिप चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, कळवण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बी एन घोडे तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com