सुत्तर फेणी बाजारात; ईद तयारी संथ गतीने

सुत्तर फेणी बाजारात; ईद तयारी संथ गतीने

जुने नाशिक | प्रतिनिधी

पवित्र रमजान महिन्याचे आता शेवटचे काही रोजे (उपवास) शिल्लक राहिले आहेत. यामुळे हळूहळू का होईना मात्र मुस्लिम बांधवांनी "ईद-उल-फित्र' ची तयारी सुरू केली आहे.

ईदच्या दिवशी घरोघरी दूध, सुुकामेेवा पासून शीरखुर्मा तयार करण्यात येतो, तर सेवाई व सुतरफेणी देखील तयार होते.

शेवई तयार करावी लागते मात्र सुतरफेनीत फक्त गरम दूध टाकून खाता येेेते. सुतरफेणी उपलब्ध झाली आहे.

सध्या फक्त सकाळी काही वेळ दुकाने सुरू राहत असल्यामुळे दूरवरून ग्राहक जुने नाशिकच्या बाजारपेठेत येत आहे.

आज पवित्र रमजानुल मुबारक महिन्याचे 20 रोसे पूर्ण होऊन शेवटच्या खंडला सुरुवात झाली. यामुळे येत्या 13 किंवा 14 तारखेला पवित्र ईद-उल-फित्रचा मोठा सण मुस्लिम बांधव साजरी करणार आहे.

यंदा कडक निर्बंधांमुळे सार्वजनिक रित्या नमाज पठाण होणार नाही तरी मुस्लिम बांधव मागील वर्षीप्रमाणे यंदाही घरोघरी नमाज पठण करतील तसेच फातेहाखानी करून शीरखुर्मा तसेच शेवाई सुतरफेनी चा आनंद घेतील, यंदा नाशिक परिसरातील दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली परिसर आदी भागात सुतरफेनीची दुकाने काही वेळेसाठी लागत आहे.

सुतरफेणी विविध रंगात उपलब्ध झाली आहे. याच्यावर गरम दूध टाकून स्वादानुसार साखर टाकल्यावर ती खाण्यासाठी तयार होते. म्हणून लोक सुतरफेणीला पसंती देतात. मालेगावसह विविध भागातून आवक झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com