नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीत शेवटच्या वर्षाकरिता सत्ताधारी भाजपमधुन सर्वच नवीन निष्ठावंत नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेवटच्या सभापती निवडणुकीत सभापती हातून निसटले जाऊ नये म्हणुन ही व्युहरचना करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे...

भाजप नेते नाशिकचे प्रभारी माजी मंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच शहर भाजप व महापालिकेतील भाजप नगरसेवकांशी स्वतंत्ररित्या चर्चा केली आहे. यावेळी मनपातील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांच्या कामासंदर्भात कार्यकर्त्यांना नाराजी व्यक्त केली होती. तसेच आता महापालिकेतील स्थायी व इतर महत्वांच्या पदावर पक्षांतील निष्ठावंत, उच्च शिक्षित, सामान्य अशांनाच संधी मिळावीत असे मत कार्यकर्त्यांनी बोलनू दाखविले होते.

याच पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेतील भाजपचे बळ अधिक वाढविण्याच्या दृष्टीने भाजपकडुन प्रयत्न केले जात आहे. आगामी निवडणुका काही महिैन्यांवर येऊन ठेपल्यामुळे आता भाजपकडुन महापालिकेवर सत्ता कायम ठेवण्याची जोरदार तयारी केली जात आहे.

नाशिक महापालिका स्थायी समितीतील भाजपचे संख्याबळ 9 वरुन 8 वर आल्यामुळे सभापती पद हातुन निसटणार का ? असा प्रश्न सत्ताधारी भाजपला पडला आहे. भाजपला बहुमतासाठी मनसेना किंवा इतर पक्षांतील सदस्यांना फोडावले लागणार असुन, तसेच भाजप मधुन कोणी फटला जाऊ नये अशी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

अशाप्रकारे स्थायी समिती सभापती पद टिकविण्यासाठी आता स्थायी समितीवर सर्वच 8 सदस्य हे नवीन पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. पक्षांतील निष्ठावंत निवडतांना शिक्षक आमदार निवडणुकीतील काही घटना, महापौर निवडणुकीतील काही घटना, निष्ठावान म्हणुन काम करणारे अशा मुद्द्यावर चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.