अवाजवी बिलाची आकारणी; महापालिकेने धाडल्या दोन रुग्णालयांना नोटीसा

अवाजवी बिलाची आकारणी; महापालिकेने धाडल्या दोन रुग्णालयांना नोटीसा

नाशिक | प्रतिनिधी

राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त बिल घेण्यात आल्याचे आरोप झाल्याने बिलांची तपासणी करण्यासाठी वारंवार सांगूनही शहरातील दोन मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलने बिले उपलब्ध करून न दिल्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा करण्याचे सांगितल्याची माहिती महापालिका मुख्य लेखापरीक्षक किरण सोनकांबळे यांनी दिली...

महापालिका प्रशासनाने शहरातील दोन हॉस्पिटल्सला नोटिसा दिल्या आहेत. यासंदर्भात मनपाचे मुख्य लेखापरीक्षक किरण सोनकांबळे यांनी सांगितले, की शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.

शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये २० टक्के बेड आरक्षित केले होते. या आरक्षित केलेल्या बेडबरोबरच सर्वच करोनाबाधित रुग्णांकडून शासनाच्या नियमानुसार बिल वसूल करण्याच्या सूचना केल्या होत्या.

असे असतानाही अनेक हॉस्पिटलमध्ये जादा बिल वसूल करण्यात आल्याच्या काही तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने दि. १ मार्च ते दि. ३१ मेपर्यंत ८० टक्के बेडवरील व २० टक्के बेडवरील सर्व रुग्णांची बिले, त्याचबरोबर रुग्ण दाखल झाल्याचा व त्यांना डिचार्ज दिल्याची संपूर्ण यादी व आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह तीन दिवसांत मनपाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या रुग्णालयांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी करून बिलाच्या वसुलीत चुका आढळून आल्यास मनपा सदर रुग्णालयांवर कारवाई करते. वेळेत माहिती न देणे व नियम न पाळणे या कारणावरून पहिल्या टप्प्यात शहरातील ५५ हॉस्पिटलना नोटिसा देण्यात आल्या, त्यानंतर दोन हॉस्पिटलना नोटिसा दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com