नाशिकरोड | प्रतिनिधी

येथील सामनगाव रोड परिसरात गाडेकर मळा येथे राहणाऱ्या रामजी लालबाबू यादव या 9 वर्षाच्या बालकाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना आज घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

रामजी लालबाबू यादव हा काल (दि.१) शेजारी राहणार्या तरुणासोबत गेल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर तरुण रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलाच्या पालकांनी रामजीबाबत चौकशी केली.

यावेळी या तरुणाने हुज्जत घालत उडवा उडवीची उत्तरे मुलाच्या पालकांना दिली. यानंतर संशय बळावल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे समजते.