Video : विवाहसोहळ्याचा नवा पायंडा; नोंदनी पध्दतीने नाशकात 'शाही विवाह'

नाशिक | प्रतिनिधी

कन्येचा विवाह साध्या नोंदणी पद्धतीने करावयाचा असे आमदार मााणिकारव कोकाटे यांंनी जाहीर केले खरे. मात्र, मंत्र्यांंचा फौजफाटा, व्याह्यांंच्या इच्छेसमोर अखेर नोंदनी पद्धतीने शाही वैदीक विवाह लावण्याचा नवा पायंंडा आमदार कोकाटे यांनी पाडला....

आज पर्यंतच्या राजकीय, सामाजिक व खाजगी जीवनात जेव्हा-जेव्हा महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा-तेव्हा समाजहिताचे लोकाभिमुख निर्णय मी घेतले. ’त्या’ काळात केलेले स्वतःचे छोटेखानी लग्न, एका मुलीवर थांबण्याचा निर्णय हे त्यापैकीच एक होते.

त्यामुळे आतादेखील कन्या सिमांतीनीचा विवाह साध्या नोंदनी पद्धतीने करण्याचे ठरविले असल्याचे आ. कोकाटे यांनी जाहीर केले होते. त्याप्रामाणे आज विवाह सिध्दार्थ राजेंद्र वानखेडे यांच्याशी झाला.

Video : विवाहसोहळ्याचा नवा पायंडा; नोंदनी पध्दतीने नाशकात 'शाही विवाह'
भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

मात्र, नोंदनी पध्दतीने विवाह हा फक्त मिडीयासाठी इव्हेंट होता. खरा वैदीक विवाह गंंगावर्‍हे येथे एका लॉन्सवर शाही पध्दतीने झाला. त्याता एक दिड हजार मित्र, नातेवाईकांनी हजेरी लाऊन नव दांपत्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री सुनील केदार, पालकमत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आदींंसह नाशिकच्या सर्वच लोकप्रतनीधींची उपस्थिती होती.

त्यामुळे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याची टिका होऊ लागली. त्यावर आ. कोकाटे म्हणाले की, जीवनाच्या व्यासपीठावर लग्न कार्य, त्यात होणारा अनाठायी खर्च व तत्सम सामाजिक चालीरीतीवर यावर सातत्याने केलेले भाष्य, त्याला वास्तवतेमध्ये न्याय देण्याची वेळ असल्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार, केवळ पन्नास लोकांमध्ये हा विवाह सोहळा करणे तरी शक्य नसल्याने हा निर्णय घेतला होता.

आयुष्याच्या या वळणावर माझ्या अत्यंत जवळचे मित्र, नातेवाईक, स्नेही, हितचिंतक, कार्यकर्ते यांची संख्या असंख्य आहेत.

संपूर्ण मतदार संघ माझं कुटुंब आहे. त्यातून पन्नास लोक निवडणे माझ्यासाठी अशक्य होते. साध्या नोंदणी पद्धतीनेच विवाह करण्याची माझी इच्छा होती. मात्र व्याह्यांची इच्छा वैदीक पध्दतीने होती.

त्यांची इच्छा पुर्ण करणे माझी जबाबादारी होती व मंंत्र्यांचा फौजफाटा मोठा असल्याने ते नियम पाळणे शक्य झाले नाही. आम्ही मोजकेच होतो. मात्र बाहेरची गर्दी झाली. त्यामुळे नाईलाज झाला असे ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com