नवीन नाशिक | निशिकांत पाटील

केंद्र सरकारने नाशिक शहरात मेट्रो प्रकल्पासाठी 2092 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी आता त्यावरून श्रेय वादाची लढाई सुरू झाली असताना ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिकला या मेट्रोची खरच आवश्यकता आहे का ? असा प्रश्न नाशिककरां कडून उपस्थित राहत आहे...

नाशिक शहराला प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, गुलशनाबाद, यासोबतच महाभारतातील पांडवांनी मुक्काम केलेली भूमी म्हणून ओळखले जाते. यामुळे शहराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळा नाशिक, त्रंबकेश्वर येथे होत असतो.

नाशिक शहरात औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यानंतर नाशिक मध्ये रोजगारासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने शहरातील लोकसंख्या वाढी सोबतच विकासाला सुरुवात झाली.

नाशिक शहरात विकासाच्यादृष्टीने केंद्र सरकार तर्फे निओ मेट्रो च्या प्रकल्पासाठी 2092 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र त्यासाठी असलेल्या मार्गाचे नियोजनात अभाव राहिल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले.

सध्याच्या नियोजनानुसार मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्ग 22 किलोमीटरचा असेल गंगापूर गाव ,शिवाजी नगर ,श्रमिक नगर ,औद्योगिक वसाहत ,मायको सर्कल ,सीबीएस ,सारडा सर्कल, द्वारका, गांधी नगर ,नेहरु नगर ,दत्त मंदिर ,नाशिक रोड असा एक तर दहा किलोमीटरचा गंगापूर ,जलालपूर नवश्या गणपती, थत्तेनगर, मुंबई नाका असा दुसरा मार्ग असणार आहे.

तिसरा मार्ग मुंबई नाका ते सातपूर कॉलनी मार्गे गरवारे असा असणार आहे सीबीएस हे मध्यवर्ती असून या टायर बेस मेट्रोसाठी एकूण 29 स्टेशन असणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून नाशिककर स्मार्ट सिटीच्या कामाला कंटाळले असताना आता निओ मेट्रोच्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा वाहतूक कोंडी व मार्गात बदल अशा अनेक संकटांचा सामना नाशिककरांना करावा लागणार असल्याने मेट्रो हवी की नको हा चर्चेचा विषय ठरत आहे.

इगतपूरीहून नाशिक रोड पर्यंत लोकल यावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अद्याप याला यश आले नाही हे तर नाशिककरांना ठाऊकच आहे .यासोबतच नाशिकचा विकास व्हावा या दृष्टीने बऱ्याच वर्षांपासून औद्योगिक वसाहतीत कुठलाही मोठा प्रकल्प अद्याप पर्यंत आलेला नाही.

सिडको प्रशासनातर्फे स्वस्त दरात घरे देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नवीन प्रकल्प अद्याप जागेच्या शोधात आहे. नाशिका वर अशा अनेक अडचणी असून निओ मेट्रोसाठी केंद्र, राज्य राज्य सरकार व मनपा चा निधी खर्च होणार आहे.

एकीकडे फक्त ड्रेनेजच्या कामासाठी रस्ता खणल्यावर अनेक महिने वाहनचालकांना मनस्ताप सहन करत मार्गक्रमण करावे लागते. अशातच जुने कामे प्रस्तावित ठेवून नवीन प्रकल्प सादर करणे हे आगामी मनपा निवडणुकीसाठी नाशिककरांना ? असा सवाल काही नाशिककरांनी व्यक्त केला आहे.

नाशकात रखडलेले प्रकल्प आधी पूर्ण करा व ते करताना नियोजन करा. निओ मेट्रो प्रकल्पाच्या विरोधात लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.
ॲड. मनोज आहेर