नाशिकच्या सायली व तनिशाची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

नाशिकच्या सायली व तनिशाची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ट्युनिशिया (Tunisia) येथे होणाऱ्या डब्लूटीटी युथ कंडेंडर १५ वर्ष वयोगटाखालील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या सायली वाणी व तनिशा कोटेचा यांची मुलींच्या भारतीय संघात निवड झाली....

या स्पर्धा दि. १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या संघात पुण्याच्या प्रीथा वर्टीकर (Pritha Vartikar) व हरियाणाच्या सुहाना सैनी (Suhana Saini) यांचादेखील समावेश आहे. सायली ही राष्ट्रीय स्तरावर प्रथम मानांकित तर तनिशा ही तृतीय मानांकित आहे.

गेल्या ३ ते ४ वर्षांपासून नाशिकच्या टेबल टेनिसपटूनची राज्य व राष्ट्रीयस्तरावर कामगिरी उल्लेखनीय होत आहे. सायली वाणी हिने मार्च मध्ये इंदोर येथे झालेल्या २०२० च्या राष्ट्रीय अजिंक्य टेबल टेनिस स्पर्धेत सब ज्युनियर मुलींच्या गटाचे राष्ट्रीय विजेते पद मिळविले होते.

तनिशा हिने कांस्य पदक पटकावले होते. या आधी तनिशा हिने सुद्धा या आधी २०१९ मध्ये मस्कद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ज्युनिअर सर्किट टेबल टेनिस स्पर्धेत कॅडेट मुलींच्या संघाचे भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्य पदकही पटकावले होते.

नाशिकच्या दोन मुली एकाचवेळी भारताचे प्रतिनिधित्व पहिल्यांदा करीत आहेत. या स्पर्धेत जर्मनी (Germany), उजबेकिस्तान (Ujbekisthan), इजिप्त (egypt), अलज्जेरिया (algeria), घाना (Ghana), ट्युनिशिया, मालदीव (Maldives), बेलज्जियम (Belgium) आदी देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघी नियमित सराव करतात.

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा आज नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड (Narendra Chhajed President Nashik District table tennis ) तसेच नाशिक जिमखान्याचे सचिव राधेश्याम मुंदडा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव शेखर भंडारी यांनी प्रास्ताविक केले. या शुभेच्छा सोहळ्यात संघटनेचे मिलिंद कचोळे, सतीश पटेल, अली आदमजी व अभिषेक छाजेड तसेच प्रशिक्षक जय मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.

यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, जनरल सेक्रेटरी प्रकाश तुळपुळे, सेक्रेटरी यतीन टिपणीस, कोषाध्यक्ष संजय कडू, उपाध्यक्ष शिवाजी सरोदे, संजय मोडक, राजेश भरवीरकर, योगेश देसाई, सुधीर मांजरे, सुहास दांडेकर, गणेश माळवे आदींनी अभिनंदन केले.

शेखर भंडारी सचिव नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com