निसरड्या रस्त्यावरून नागरिकांनी मरायचे का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाच नाशिककरांनी केले ट्विट

निसरड्या रस्त्यावरून नागरिकांनी मरायचे का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाच नाशिककरांनी केले ट्विट

नाशिक | Nashik

नाशिक द्वारका उड्डाणपूलाखालील रस्त्यावर ऑइल व माती मिश्रित वरील पुलाचे पाणी रस्त्यावर सांडल्याने निसराळी स्थिती झाली असून, काही दिवसांपासून गाडया घसरुन वाहनांचे नुकसान होऊन, चालक व त्यांचे सोबत असणा़र्‍यांनो जीव धोक्यात घालुन चालावे लागत आहे...

या दुर्लक्षित निसरड्या रस्त्यावरून नागरिकांनी मरायचे काय? नेमकी ही जबाबदारी कुणाची हे यांनी ठरवावे व याचे कायमस्वरूपी काम करावे आणि नागरिकांना होणार्‍या त्रासातून मुक्त करावे म्हणून थेटे केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनाच ट्विट करून ही माहिती पोहोचविली आहे.

भाजपचे सोशल मिडीया प्रमुख प्रवीण अलई स्वतः या दुर्घटनेला सामोरे गेलो. त्यांची अ‍ॅॅक्टिवा 40 स्लिप होऊन 10 ते 12 फूट लांब फरफटत गेले. उजव्या हाताला व डाव्या पायाला जबर मार लागला असून वैद्यकीय उपचार घेऊन घरी बसण्याची वेळ आली आहे.

पडल्या बरोबर पहिला फोन फायर ब्रिगेड ला केला.नंतर नाशिक पोलीस आयुक्तालयात याबाबत कळविले त्यावेळी त्यांनी सूचना केली की अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू आहे मात्र कुणीही याकडे जबाबदारीने लक्ष द्यायला पुढे येत नाही. नंतर त्यांनी लागलीच रस्ता बंद करीत वाहतूक इतरत्र वळविली.

त्यानंतर नाशिक महानगर पालिकेच्या संपर्क विभागाला फोन करून संताप व्यक्त केला जातो. त्यांच्या कडुन काही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने शेवटी महापौर यांना करतात. तो ही अनेक वेळा व्यस्त लागतो , नंतर त्यांचा फोन येतो.

आणि त्यांना याची माहिती दिली असता त्वरित फायर ब्रिगेड ला तेथे पाठविता म्हणतात. मात्र त्यानंतर ही मी 2 तास तेथे बसूने कुणीही येत नाही. मात्र रस्त्यावरून घसरणे आणि रुग्णवाकेतून रुग्णालयात पाठविणे सुरूच राहते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com