Nashik News : वारकऱ्यांच्या हातून सरबत घेत नाना बच्छाव यांनी उपोषण सोडलं

शिवतीर्थावर साखळी उपोषण कायम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील शिवतीर्थावर गेल्या ५२ दिवसांपासून नाना बच्छाव (Nana bachhav) यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण व ६ दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. काल (दि २ रोजी) रात्री आंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुटल्याने त्यांच्या सूचनेनुसार आज (दि. ३) नाशिकला नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण वारकऱ्यांच्या हातून सरबत घेत सहा दिवसांनी सोडले...

मात्र शिवतीर्थावर साखळी उपोषण सुरूच राहणार आहे,दरम्यान उपोषण कर्ते नाना बच्छाव यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना नवीन नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या भागातील मराठा तरुणांवर गुन्हे सत्ताधारी आमदारांच्या म्हणण्यानुसार कसे होतात?हे दुर्दैव आहे. तसेच अंबड चे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली तातडीने होणे हे सुडाचे गणित आहे. हे थांबवा यासाठी आग्रह लावून धरला होता. यावेळी आयुक्तांना पत्र देऊन तातडीने मराठा युवकांवर गुन्हे मागे घ्या, मराठ्यांच्या मुळावर उठू नका, अधिकाऱ्यांची बदली रद्द करा हे पत्र मराठा महिलांनी आयुक्तांना दिले.

यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी फोनवरून उपोषणकर्ते नाना बच्छाव यांना फोन केला व उपोषण सोडा, मी मराठा युवकांवर गुन्हे मागे घेण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी समजूत घातली.

Nashik News : वारकऱ्यांच्या हातून सरबत घेत नाना बच्छाव यांनी उपोषण सोडलं
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटना भिडल्या, कार्यकर्तेमध्ये जोरदार राडा... प्रकरण काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या कालच्या आवाहनानुसार गाव, खेडे, शहरातील मराठ्यांनी मराठा आंदोलनासाठी उभे केलेले साखळी उपोषणे सुरू ठेवावी, आमरण उपोषणे मागे घ्यावी, शांततेच्या आंदोलनाने सरकारला जागे करा. येत्या दोन महिन्यांच्या वेळेत मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे. राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास मुंबईची आर्थिक नाडी थांबवू. पाच कोटो मराठा मुंबईच्या सीमा अडवतील,असे आवाहन गाव खेड्यापर्यंत नेऊन हे आंदोलन तेवत ठेवण्यासाठी यापुढं शिवतीर्थावर सक्रिय सकल मराठा समाजाच्या वतीने जागृती करणार असल्याची माहिती प्रवक्ता प्रचारक नितीन डांगे पाटील, प्रचारक राम खुर्दळ यांनी यावेळी सांगितले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : वारकऱ्यांच्या हातून सरबत घेत नाना बच्छाव यांनी उपोषण सोडलं
ठाकरे गटाला धक्का; आमदार रविंद्र वायकरांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

नाशिकच्या शिवतीर्थ येथे उपोषणकर्ते नाना बच्छाव यांना सरबत देऊन वारकरी संप्रदायातील हभप कृष्णा महाराज धोंडगे, हभप पुंडलिकराव थेटे, हभप रामदास पिंगळे, मराठा उत्कर्ष समितीचे हरिभाऊ शेलार, पैलवान हिरामण वाघ यांनी उपोषण सोडवले. यावेळी सकल मराठा समाजाचे राम खुर्दळ, नितीन डांगे पाटील, प्रफुल्ल वाघ, शरद लभडे, विकी गायधनी, संजय फडोळ, नितीन रोटे पाटील, योगेश कापसे, मंगला शिंदे, ममता शिंदे, रोहिणी उखाडे, स्वाती आहेर, वंदना पाटील, पूजा धुमाळ, ज्ञानेश्वर कवडे, सरपंच परिषदेचे तानाजी गायकर, नितीन शेजवळ, सुरेश कोंबडे, हर्शल पवार, पवन पवार, राज भामरे, निलेश ठुबे, सुभाष शेळके, अण्णा पिंपळे, सचिन निमसे, अरुण पळसकर, अनिल आहेर, संदीप खुंटे पाटील, सुभाष शेळके, श्रीराम निकम, शिवाजी धोंडगे आदी उपस्थित होते.

Nashik News : वारकऱ्यांच्या हातून सरबत घेत नाना बच्छाव यांनी उपोषण सोडलं
विषारी नशाबाजांचा ‘वर्षा’वर सुळसुळाट; एल्विशवरुन विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com