आधूनिकतेचा उपयोग करुन भक्तीची करोनावर मात
नाशिक

आधूनिकतेचा उपयोग करुन भक्तीची करोनावर मात

देशात प्रथमच आँनलाईन विधानपूजा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

उमराणे | विनोद पाटनी

दिगंबर जैन परंपरेनुसार दरवर्षी अष्टान्हिका पर्वात म्हणजे चातुर्मास सुरु होण्याच्या 8 दिवस अगोदरचा काळात संपूर्ण देशभरातील जैन मंदिरात सिध्दचक्र विधानाचे आय़ोजन केले जाते या आठ दिवसाचे खूप मोठे धार्मिक महत्व आहे. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार द्वारा दिलेल्या नियमानुसार, मंदिरामध्ये याप्रकारचे आयोजन करने अशक्य होते.

या समस्येवर मात करण्यासाठी नाशिकचे युवा पारस लोहाडे यांनी नविन संकल्पना णमोकार तीर्थ प्रणेता राष्ट्रसंतआचार्य श्री देवनन्दिजी गुरुदेव यांच्या समोर ठेवली. या संकल्पनेनुसार भक्तांनी झूम अँप्लिकेशन द्वारे घरबसल्या विधानपुजेमध्ये सम्मिलित व्हावे, अँप्लिकेशन द्वारे संगीतकार आपल्या घरी बसुन संगीत देईल, पंडीत आपल्या घरुन मंत्र बोलतिल. देवनन्दिजी महाराज णमोकार तीर्थावरुन मार्गदर्शन देतील.

या विधानात 2000 अर्घ्य दिले जातात त्यासाठी पुस्तक लागते, त्याचाही मार्ग काढण्यात आला, मोबाईल च्या स्क्रिन वर वेळोवेळी ते अर्घ्य दाखविेले जातील. या योजनेला देवनन्दीजी महाराज यानी होकार दिला. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन पूर्ण देशातच नव्हे तर विदेशात पोहचविली.

फक्त 3 दिवसात 750 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. आज सकाळी णमोकार तिर्थावर ट्रस्टचे अध्यक्ष नीलम अजमेरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन शुभारंभ झाला. हे विधान आज 28 जुन पासुन 5 जुलै पर्यंत चालणार आहे. यामध्ये रोज सकाळी 6 ते 8 चंद्रप्रभु शांतिनाथ भगवान प्रतिमेचे चे अभिषेक, पुजन, विधान आदि संपन्न होतील. सायकाळी 7 ते 8.30 वाजता महाआरती आचार्यश्रींचे प्रवचन, चर्चा समाधान आदि संपन्न होतील.

याविधानामध्ये देशातील सर्व राज्यातील भाविक सम्मिलित झाले आहेत. तसेच विदेशातील भक्त ही शामिल झालेले आहे. अमेरिका, संयुक्त अमिरात, दुबई येथील जैन धर्मीय यामध्ये सामिल झालेले आहेत. याचे आयोजन जैनम डिजिटल झूम चैनल वर आयोजित केले आहे. सहभागी सर्व भक्त खूप खुश आहेत. याबद्दल बोलतांना सहभागी वर्धमान पांडे औरगांबाद यांनी सांगितले की, आम्ही घरी बसुन विधानपूजा करीत आहेत परंतु असे वाटत आहे कि आम्ही प्रत्यक्ष विधानामध्ये बसलो आहेत. कोणतीही गोष्टीची कमी नाही. असे स्वप्नातही वाटले नव्हते कि घरी बसुनही इतक्या आनंदाने विधानपूजा होवु शकते.

या विधानाचे मार्गदर्शक आचार्यश्री देवनन्दिजी महाराज यानी सांगितले की, कोरोनाच्या काळात 3 महिन्यापासुन भक्त घरी बसुन कंटाळले आहेत. मंदिरात जायची सोय नाही. देवदर्शन नाही, त्यामध्ये अष्टान्हिका पर्व हे सगळ्यात मोठे पर्व असुनही मंदिरात जाताही येणार नाही यासाठी भक्त नाराज होते, या संकल्पनेचा लाभ मोठ्या प्रमाणात लोकांना होत आहे व कोरोना संक्रमणाची भितीही संपली आहे.

कार्यक्रमाचे मंच संचालन औरंगाबाद येथील प्रविण लोहाडे हे करीत आहे, संगीतकार भोपाळ येथील धरमवीर जैन हे आहेत. ज्यांनाही या विधानात बसायचे असेल त्यांनी रोज सकाळी जैनम झूम चैनल लावुन बसावे अशी विनंती णमोकार तीर्थाचे अध्यक्ष निलम अजमेरा, उपाध्यक्ष महावीर गंगवाल, मंत्री अनिल जमगे, संतोष काला ब्रम्हचारी वैशाली दीदी यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com