नामको हॉस्पिटलला 'एनएबीएच' मानांकन बहाल

रुग्णसेवा आणि गुणवत्तापूर्ण सुविधांवर शिक्कामोर्तब
नामको हॉस्पिटलला 'एनएबीएच' मानांकन बहाल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कॅन्सर, मल्टिस्पेशालिटी आणि डायलिसीस अशा विविध सेवा अल्पदरात देणाऱ्या नामको हॉस्पिटलला (Nashik Merchant cooperative hospital) भारत सरकारच्या भारतीय गुणवत्ता परिषदेंतर्गत 'एनएबीएच'  (national accreditation board for hospitals and healthcare) मानांकन बहाल करण्यात आले. अखंड रुग्णसेवा, उपलब्ध संसाधने आणि उपचारांची कायम राखलेली गुणवत्ता या निकषांवर हे मानांकन देण्यात आले...

गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतांना आवडणारे' ब्रीद घेऊन अखंड रुग्णसेवा देत असलेल्या नामको हॉस्पिटलमधील सेवांचा उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमधील रुग्णांनीदेखील लाभ घेतला आहे. रुग्णांच्या गरजेनुसार विविध विभागांच्या विस्तारीकरणाचे कामही विश्वस्त मंडळाने हाती घेतले आहे.

हे करताना उपचारांची गुणवत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान हॉस्पिटलने पेलले. मानांकनाच्या दृष्टीकोनातून कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आले. पारदर्शकता, गुणवत्ता सुधार, रुग्णसेवा आणि विस्तार अशा चारही बाजू संतुलित राहतील,

यासाठी विश्वस्त प्रयत्नशील होते. त्याचाच परिपाक म्हणून भारत सरकारच्या भारतीय गुणवत्ता परिषदेंतर्गत नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर (एनएबीएच) मानांकन बहाल करण्यात आले.

नामको हॉस्पिटलसाठी (Namaco) हा बहुमान असल्याचे सांगत संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी (Sohanlal Bhandari) यांनी यापुढेही रुग्णसेवेची ही भरारी कायम ठेवली जाईल, अशी ग्वाही दिली.

रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स, आरोग्य सेवक, कर्मचारी अशा प्रत्येक घटकाचे योगदानदेखील या यशासाठी महत्त्वाचे ठरले. विस्तारीकरणाच्या पुढील टप्प्यांतर्गत कार्डियाक केअर सेंटर, बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभाग लवकरच रुग्णसेवेत दाखल होईल.

शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको चॅरिटेबल ट्रस्ट

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com