नगरपंचायत मतदान : दुपारी दीडपर्यंत निफाडमध्ये अवघे १९ टक्के मतदान

नगरपंचायत मतदान : दुपारी दीडपर्यंत निफाडमध्ये अवघे १९ टक्के मतदान

दिंडोरी, निफाड, पेठ, सुरगाणा आणि कळवणमधील मतदानाची टक्केवारी पाहा इथे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, निफाड, पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी येथील नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला आहे....

थंडीमुळे पहिल्या दोन तासांत मतदानासाठी प्रतिसाद अल्पप्रमाणात होता. मात्र, तद्नंतर मतदार घराबाहेर पडल्यामुळे टक्का वाढलेला दिसून येत आहे.

दुपारी दीड वाजेपर्यंत २९.०९ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३१.७७ इतकी आहे तर महिला मतदारांची टक्केवारी २६.३३ इतकी आहे.

यामध्ये पेठमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत ३८.४२ टक्के मतदान झाले. तर सुरगाणा या आदिवासी बहुल भागात ३३.४५ टक्के मतदान झाले आहे. दुसरीकडे कळवणमध्ये २७.०९ टक्के मतदान झाले तर देवळा नगरपंचायतसाठी दुपारी दीडपर्यंत ३५.७३ टक्के मतदान झाले.

दिंडोरीत ३४.२९ टक्के मतदान झाले आहे. तर निफाड या सधन आणि सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या सर्वात कमी १८.९० टक्के मतदान झाले आहे.

निफाडमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली असली तरीदेखील दुपारपर्यंत इथे प्रतिसाद कमी असल्याने मतदानाची टक्केवारी यंदा घसरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

मतदानाची प्रशासनाने चोख तयारी केली आहे. नगरपंचायतीच्या क्षेत्रातील मतदानासाठी स्थानिक क्षेत्रात पूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली असल्याने मतदार राजा उत्स्फूर्तपणे मतदानासाठी मतदान केंद्रांवर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

आदिवासी बहुल भागातून मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत असते, हे मजूरदेखील निवडणुक असल्याने मतदानासाठी मालेगाव, नांदगाव, निफाड येवला, बागलाण या भागातून पेठ सुरगाणा येथे मतदानासाठी पोहोचलेले दिसून आले.

अनेक ठिकाणी तर उमेदवारांनी या मजूर असलेल्या मतदारांच्या ने-आण करण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात होते.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशानुसार आज सर्वत्र सुट्टी जाहीर केली आहे. यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने यांना आज सुट्टी दिली आहे.

अपवादात्मक परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ,दिंडोरी, सुरगाणा, कळवण व देवळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात येणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.

निफाडमध्ये अवघे १८.९० टक्के मतदान

निफाड नगरपंचायतीसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत अवघे १८.९० टक्के मतदान झाले. निफाड शहरात तपमान घटल्याने सकाळपासून मतदानाला प्रतिसाद दिसून आला नाही.

सकाळी 9 वाजेपर्यंत अवघे 5 टक्के मतदान झाले होते .मात्र, सकाळी 11 वाजेनंतर मतदार घराबाहेर पडू लागल्याने मतदानाची टक्केवारी वाढू लागली आहे.

निफाड शहरात पुरुष मतदार 7091.तर महिला मतदार 6938 व इतर 1 असे 14 हजार 030 मतदार 14 प्रभागातील 43उमेदवाराचे भवितव्य ठरविणार असून दुपारी 1.30 वाजेपर्यंत 2 हजार 759 पुरुषांनी तर 2 हजार 312 महीला असे एकून 4 हजार 771 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून येथे 37.1 टक्का मतदानाची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com