...अखेर महापालिकेतील पदोन्नत्यांना मुहूर्त

...अखेर महापालिकेतील पदोन्नत्यांना मुहूर्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आठ वर्षाच्या खंडानंतर महापालिकेत पदोन्नतीची प्रक्रीया राबविण्यात आली. (Nashik municipal corporation promotion) त्यामुळे पदोन्नती मिळालेल्या १९१ लिपीकांच्या पदस्थापनेबरोबरच बदल्याही करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी ठाण मांडणाऱ्यांना देखील या निमित्ताने दणका मिळाला आहे...

आता अ वर्गातीलस्थापत्य अभियंत्यांच्या पदोन्नत्या हेाणार असून त्यातील फेरबदलांकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे. महापालिकेत २०१३ नंतर पदोन्नतीची प्रक्रीया रखडली होती. दोन वर्षापांसून लोकप्रतिनिधी (corporators) आणि कर्मचारी संघटना (Karmchari Sanghatna) आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाने देखील हा विषय हाती घेतला.

अखेरीस दिवाळीनंतर प्रशासाने सुमारे ४३६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्या आणि ३७ अ आणि ब वर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय नियुक्ती प्राधीकरणअसलेल्या महासभेत ठेवला हेाता. महासभेने (NMC Mahasabha) तो मंजुर केल्यानंतर पदस्थापनांना सुरूवात केली आहे.

यातील यांत्रिकी विभागाच्या (IT Department) पदोन्नतीची संख्या कमी असल्याने त्यांच्या अगोदरच पदस्थापना झाल्या आहेत. ततर ११२ वरीष्ठ आणि ७९ कनिष्ठ लिपीकांना (Junior Clark) पदस्थापनेच्या निमित्ताने बदल्या करण्यात आल्या आहेत. आता स्थापत्य अभियंत्यांच्या पदस्थापनेच्या निमित्तानेबदल्या होणार असून त्यातील फेरबदलांकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com