
इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundegaon Tal Igatpuri) येथील आदिवासी विकास विभागाच्या (Tribal development dept) इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील (English medium ashramshala) १५ विद्यार्थ्यांना करोना झाल्याचे निदान झाल्याचे निष्पन्न झाले होते....
यानंतर आरोग्य विभाग खडबडुन जागे झाले असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन आज या निवासी आश्रम शाळेतील वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख (Taluka health officer M B Deshmukh) यांनी दिली.
काल निष्पन्न झालेल्या कोरोना बाधित १५ विद्यार्थ्यांवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. वर्ग बंद असल्याने उर्वरीत विद्यार्थी आपआपल्या रुम मध्येच थांबुन आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवुन असुन पुढील आदेश येईपर्यंत वर्ग बंदच राहाणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) एका विद्यार्थ्याला किरकोळ लक्षणे जाणवत असल्याने त्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Vadivarhe PHC) आरोग्य पथकाने सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) केल्यानंतर १५ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसली तरी उपचार करण्यासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आश्रमशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्य यांनी भेट देऊन वैद्यकीय पथकाला सूचना केल्या.
वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कामगार, येणारे जाणारे नागरिक आदी ३४० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली.
आरोग्य सहाय्यक तानाजी अहिरराव, वैज्ञानिक अधिकारी डॉ. कावेरी ढिकले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री घरटे, आशा कार्यकर्त्या यांच्या पथकाने रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.