मुंबईनाका परिसरात वाहतुक कोंडी; टेम्पो - कारचा किरकोळ अपघात

मुंबईनाका परिसरात वाहतुक कोंडी; टेम्पो - कारचा किरकोळ अपघात

नाशिक | प्रतिनिधी

कोरोना निर्बंध शिथिल होताच नागरीक बाजारपेठांमध्ये तुटून पडले आहेत. यामुळे शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. अशातच मुंबईनाका पोलीस ठाण्यासमोरच सर्कलवर टेम्पो आणि कारच्या किरकोळ अपघात झाल्याने ऐन पावासत येथे अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला...

शहरात वाढलेली गर्दी, वरून अत्यंत हलक्या स्वरूपात बरसणारा पाऊस आणि वाहनचालकांची पुढे जाण्याची घाई यामुळे रस्त्यावरील अपघातांमध्ये वाढ झाली असून, वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा तीव्र झाली आहे.

मुंबई नाका येथे दुपारच्या सुमारास कार आणि टेम्पोमधील किरकोळ अपघातानंतरमुंबई नाका सर्कल येथे दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. हायवेकडून शहराच्या बाजुने पुढे येणार्‍या एक टेम्पो कारला घासून गेला.

पुढे जाऊन हा टेम्पो पोलिस ठाण्यासमोरच भर रस्त्यात बंद पडला. तर, अपघातामुळे कारचालकही रस्त्यावर थांबला. दोन वाहने रस्त्यात उभी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांनी कारला आणि टेम्पोला रस्त्याच्या बाजुला घेतले.

मात्र, या किरकोळ अपघातामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास येथील वाहतूक संथपणे सुरू असल्याने वाहनचालकांना मनस्तापाला समोरे जावे लागले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com