लालपरी सुस्साट : फेऱ्यांची संख्या पोहोचली १ हजारावर

लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये मोठी गर्दी
लालपरी सुस्साट : फेऱ्यांची संख्या पोहोचली १ हजारावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन नाशिक विभागात (Nashik Division) (दि.७) जूनपासून जिल्हयासह राज्यांतर्गत बस धावत आहे. ट्प्याट्प्याने सुरु करण्यात आलेल्या एसटी फेर्‍यांची संख्या तब्बल हजारापर्यत जाऊन पोचली आहे. लवकरच पुढील काही दिवसात नाशिक विभागातील बसेस पूर्ण क्षमतेने धावण्याची शक्यता आहे....(One Thousand round ST Bus Nashik Division)

कोरोनाच्या वाढ्त्या प्रादुर्भावामूळे (Corona Virus) राज्यातील बसेस गेल्या काही महिन्यांपासून डेपोमध्ये उभ्या होत्या, जूनच्या पहिल्या आठ्ववड्यापासून पून्हा बस सेवा सुरु झाली आहे. कोरोनाची परिस्थिती कमी होते आहे, त्याप्रमाणात एसटी फेर्‍याची संंख्या वाढवली जात आहे.

नाशिक-अमरावती, नाशिक-नागपूर, नाशिक-हिंगोली, नाशिक-लातूर, नाशिक - कोल्हापूर, नाशिक - हैद्राबाद या लांब पल्यांच्या बसेसचा प्रारंभ काही दिवसांपूर्वीच झाला असून त्यास प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी म्हट्ले आहे.

यंदा आषाढी वारी रद्द झाल्याने कोट्यावधीचे नूकसान एसटी महामंड्ळाला (MSRTC) बसणार आहे, मागील वर्षीही वारी रद्द झाल्याचा फट्का बसला होता. आषाढी वारीसाठी नाशिक शहर आणि जिल्हयातून हजारो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात.

यातून एसटीच्या महसूलात चांगलीच वाढ होते. वारीसह इतर धार्मिक स्थळे कोरोनामूळे अद्याप बंद असल्याने एसटीला फट्का बसत असल्याचे एसटी अधिकारी सांगतात. गेल्या काही वर्षापासून एसटी तोट्यात चालल्याचे चित्र आहे.

नूकतेच राज्य शासनाने एसटी महामंडळातील सेवकांंच्या वेतनासाठी सहाशे कोटींची मद्त केली. सध्याच्या स्थितीत नाशिक जिल्हयातून बसेसच्या हजार फेर्‍या सुरु झाल्याने यातून महसूल मिळ्ण्याची अपेक्षा आहे.

पुढील काही दिवसात पूर्णक्षमतेने बसेस सुरु झाल्यास याचा महामंड्ळाला (MSRTC) फायदा होउ शकतो. सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे, दुदैवाने असे झाल्यास पून्हा एसटीची चाके थांबू शकतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com