विद्युत खांब उभारण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना मारहाण
देशदूत न्यूज अपडेट

विद्युत खांब उभारण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना मारहाण

नाशिक | प्रतिनिधी

वादळी वारे व पावसामुळे पडलेले विजेचे खांब उभारण्यासाठी गेलेल्या विज विजरण कंपनीचे कर्मचारी तसेच कामगारांना तीघांनी बेदम मारहाण केल्याची घटना नानेगाव शिवारात घडली...

शंकर कचरू आडके, संदिप शंकर आडके, तसेच त्याचा एक मित्र अशी मारहाण करणार्‍या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी विज वितरण कंपनीचे वायरमन चंद्रकांत पोपट पाळदे यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, पाळदे हे वादळी वार्‍याने नानेगाव येथे आडके यांच्या शेतात पडलेला विजेचा खांब उभा करण्याचा प्रयत्न करत असताना आडके व तेथील मुलांनी पाळदे तसेच तेथे काम कारणार्‍या कामगारांना बेदम मारहाण केली.

या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक गिते करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com