नाशिकची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी 'हे' करा

खासदार हेमंत गोडसे यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट
नाशिकची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी 'हे' करा

नाशिक | Nashik

शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून शहराचा औद्योगिक विकास (Nashik city industrial development) झपाटयाने होत आहे. असे असले तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या रूंदीमध्ये फारसा बदल झालेला नाही. परिणामी शहरात वाहतुकीची समस्या (Traffic jam issue) मोठया प्रमाणावर आहे. शहराचा समतोल विकास साधण्यासाठी आणि भविष्यात उद्भवणारी वाहतुक कोंडीची समस्या लक्षात घेता शहराच्या अंतर्गत रिंगरोड होणे अत्यंत गरजेचे आहे....

यामुळे शहराच्या अंतर्गत रिंगरोड (Ring road is necessary for nashik city) होणे कामी महानगरपालिकेने (NMC) ठराव करून सदर ठरावाचा प्रस्ताव मान्यतेसाठी तातडीने विशेष बाब म्हणून राज्यशासनाकडे पाठवावा असे खा हेमंत गोडसे (MP Hemant Godase) यांनी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas jadhav) यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत सांगितले.

गेल्या दशकभराच्या काळात नाशिक शहराचा वेगाने होत आहे. देशभरात नाशिक शहर धार्मिक स्थळ (Religious Places) म्हणून प्रसिद्ध असल्याने शहरात बाहेरच्या राज्यातून येणा-या भाविकांची संख्या धीच शहरातील नागरिकांच्या वाहनांची संख्या मोठी असून त्यात बाहेरील राज्यातील मोठी आहे. भाविकांच्या येणा-या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे.

वाहनांची संख्या प्रचंड मोठी होत असल्याने शहरातील चौकाचौकात वाहतुकीची पावलोपावली कोंडी होत आहे. यामुळे नागरिक तसेच भाविकांची मोठ्याप्रमाणावर कुचंबणा होत आहे. यातूनच सतत होणा-या अपघातांमुळे हकनाक नागरिकांचा बळी जात असून अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. भविष्यात होणारी वाहतुकीची भीषण कोंडीची समस्येवर मात करण्यासाठी आज खा.गोडसे यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली.

पुढील पाच वर्षांत नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhamela) भरणार अससल्याने तीन वर्षांनंतर देशभरातील साधु, महंतांची ये-जा शहरात वाढणार आहे. यामुळे भविष्यात शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजनाचे नियोजन आत्ताच होणे गरजेचे असल्याचे मत खासदार गोडसे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्या बोलतांनी व्यक्त केले आहे.

याबरोबरच शहरात भविष्यात होणारी वाहतुकीची भीषण कोंडी थांबविण्यासाठी शहर अंतर्गत ३६ मीटर रूंदीचा रिंगरोड होणे अंत्यत गरजेचे असल्याचे स्पष्ट करत महानगरपालिकेने रिंगरोडच्या प्रस्तावाला मान्यता देवून सदर प्रस्ताव मान्यतेसाठी तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा अशा सुचनेचे पत्र खा.गोडसे यांनी आयुक्तांना दिले आहे.

खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असून नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी रिंगरोड अत्यावश्यक असल्याचे लक्षात आल्याने याबाबत नगरनियोजन व बांधकाम विभागाच्या प्रशासनाची लवकरच बैठक बोलवून सविस्तर चर्चा करून रिंगरोडविषयी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी खा.हेमंत गोडसे यांना दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com