उद्यानाला शहिद पोलीसाचे नाव
नाशिक

उद्यानाला शहिद पोलीसाचे नाव

करोना योद्धे, शहिद टोंगारे यांना अशीही श्रद्धांजली

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

करोनाशी दोन हात करताना वीरगती प्राप्त झालेल्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस सेवक टोंगारे यांचे नाव पोलीस मुख्यालयात साकारण्यात आलेल्या उद्यानाला देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

पोलीस मुख्यालयातील जुन्या उद्यानाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. या उद्यानास अरूणोद्यान असे नाव देण्यात आले आहे.

तसेच याच भागात उभारण्यात आलेल्या ग्रीन जीमचेही उद्घाटन आज सायंकाळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, करोना काळात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत अरूण वामन टोंगारे हे शहिद झाले आहेत. एक कोवीड योद्धा म्हणुन ते अखेरपर्यंत लढत राहिले.

सर्व जग करोनाशी लढत असताना पोलीस दल कधीही मागे हटले नाही. टोंगारे यांच्यासह अनेक पोलीसांना वीरमरण आले अशा योद्धांचा कार्यकर्तत्वाचा सन्मान या निमित्त केला पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले, विजय खरात, सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com