Video : मराठा आरक्षण रद्दचे नाशकात पडसाद; सरकारचा निषेध

Video : मराठा आरक्षण रद्दचे नाशकात पडसाद; सरकारचा निषेध

नाशिक | Nashik

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द रद्द केले. यानंतर नाराज झालेल्या मराठा समाजबांधवांनी आज पंचवटी कारंजा येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येत राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, राज्य सरकार हाय हाय, केंद्र सरकारचा निषेध असो. अशा घोषणा करत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मराठा आरक्षण लढा यापुढे तीव्र करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समाजबांधव राजू देसले, करण गायकर यांच्यासह अनेकजन उपस्थित होते. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढतो आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, समाजातील बांधवांनी घरातच राहावे असे आवाहनदेखील याप्रसंगी करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com