मालेगावी बीट मार्शल ५ हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात

प्रातिनिधिक
प्रातिनिधिक

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव शहरातील कर्तव्यावर असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील शिपायाला पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. श्रावण किसान माळी असे या पोलीस शिपायाचे नाव आहे...

अधिक माहिती अशी की, आयशानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील आरोपीला मदत करण्यासाठी तक्रारदाराच्या भावाकडून पाच हजारांच्या लाचेची मागणी काल (दि २९) रोजी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करून याबाबत माहिती दिली.

यानंतर संशयित पोलीस शिपाई हा बीट मार्शल असून रात्रपाळीत आपल्या ड्युटीदरम्यान लाचेची रक्कम आज (दि ३०) पहाटेच्या सुमारास स्वीकारली. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस शिपायास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत चे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार एस भामरे, उज्वलकुमार व्ही पाटील, अजय के गरुड, किरण आर अहिरराव यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचारयाने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com