महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणे यांचे निधन

महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणे यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना सुधाकर तोरणे ( यांचे निधन झाले. त्या वय ८१ वर्षांच्या होत्या...

त्या डबल एमए, बीएड, ज्योतिष शास्त्र, डेफ अँड डंबची पदवी अशा उच्च विद्या विभूषित होत्या. मुंबई, पुण्यात अनेक वर्ष मराठीच्या प्राध्यापिका होत्या.

पुणे, नाशिक येथील विविध समाजसेवी संस्थामध्ये त्या पदाधिकारी होत्या. तेजस्विनी महिला संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी असताना संस्थेला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजकार्यासाठी असलेला पुरस्कार मिळाला होता.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे निवृत्त संचालक सुधाकर तोरणे यांच्या त्या पत्नी तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या त्या मातोश्री होत.

सातत्याने वृत्तपत्रीय लेखन, बालनाट्याच्या दिग्दर्शिका, महिला सबलीकरणासाठी अनेक विविध उपक्रम त्यांनी राबवले होते. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com