लोखंडेवाडी येथे नारळाच्या झाडावर कोसळली वीज

लोखंडेवाडी येथे नारळाच्या झाडावर कोसळली वीज

चिंचखेड | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी येथे एका शेतात उभ्या असलेल्या नारळाच्या झाडावर अचानक वीज कोसळली. यादरम्यान, परिसरात मोठा आवाज झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे....

लोखंडेवाडी येथे एका शेतात प्रभाकर सदाशिव उगले कुटुंबासह राहतात. याठिकाणी त्यांनी एक नारळाचे झाड अनेक वर्षांपासून लावले आहे. ७०-८० फुट उंच हे नारळाचे झाड आहे. काल (दि ३०) रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावली.

यावेळी उगले यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. या विजेची तीव्रता इतकी प्रचंड होती की नारळाच्या वरील टोकाचा सर्व भाग जळून खाक झाला.

यावेळी प्रचंड मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. नारळाच्या झाडावर पडलेल्या विजेमुळे अनेकांनी नारळाचे पेटते झाड बघितले. त्याच वेळी प्रसंगावधान राखत राहुल उगले यांनी हा थरार मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com