Photo Gallery : दंडुक्याचा प्रसाद नको असेल तर घरातच थांबा; नाशिक पोलीस ऍक्शन मोडमध्ये

Photo Gallery : दंडुक्याचा प्रसाद नको असेल तर घरातच थांबा; नाशिक पोलीस ऍक्शन  मोडमध्ये

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशिकसह शहरात ठिकठिकाणी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, विनाकारण रस्त्यावर हिंडणाऱ्या, दुचाकी सैरावैरा पळवणाऱ्या रिकामटेकड्यावर आता कारवाई केली जात आहे. नवीन नाशिकमधील बऱ्याच भागात पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद अनेक नागरिकांना घरचा रस्ता दाखवला...

नवीन नाशिक परिसरातील त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यादरम्यान, सायंकाळी विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना लाठीचा प्रसाद त्यांनी दिला.

अत्यावश्यक कारण असेल आणि सोबत काही पुरावा असेल तरच पोलीस अशा नागरिकांना जाऊ देत आहेत. कुठलेही कारण नसेल तर त्यांना परत पाठवत पुन्हा शहरात न येण्याचे आवाहनदेखील करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com