लाॅकडाॅऊन इम्पॅक्ट : नाशिककरांनी करुन दाखवले

जिल्ह्याचा करोना पाॅझिटिव्ह रेट १०.४४ टक्क्यांपर्यंत खाली उतरला
लाॅकडाॅऊन इम्पॅक्ट : नाशिककरांनी करुन दाखवले

नाशिक । प्रतिनिधी

करोना पाॅझिटिव्हिटी दरात देशात पहिला अशी नामुष्की ओढावलेल्या नाशिकमध्ये लाॅकडाऊनचे सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहेत. मागील बावीस दिवसात करोना पाॅझिटिव्ह होण्याचा दर २३.७१ टक्क्यांवरुन १०.४४ टक्के इतका खाली घसरला आहे. परिणामी रुग्णवाढिचा आलेख खालावला असून दिवसाला हजार ते बाराशे इतके रुग्ण पाॅझिटिव्ह सापडत आहे....

करोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक कहर ज्या जिल्ह्यांमध्ये झाला त्यात नाशिक आघाडीवर होते. दिवसाला पाच ते सहा हजार इतके पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत होते. एका अहवाल‍नूसार देशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देशात सर्व मोठ्या शहरांना मागे टाकत नाशिक पहिल्यास्थानी पोहचले होते.

त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मे महिन्याच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह रेट हा तब्बल २३.७१ टक्के इतका होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. बेड, ऑक्सिजन, रेमडिसिव्हर याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

मात्र, राज्य शासनाने 'ब्रेक दी चेन' अंतर्गत कडक निर्बंध जारी केले. तसेच जिल्हाप्रशासनानेही हा पाॅझिटिव्ह रेट कमी करण्यासाठी युध्दपातळीवर हालचाली करत स्थानिक पातळीवर १२ ते २३ मे असा कडक लाॅकडाऊन लावला.

नाशिककरांनीही त्यास सहकार्य करत नियमांचे पालन केले. त्या सर्वांची परिणीती म्हणजे पाॅझिटिव्हिटिचा आलेख खालावत असल्याचे पहायला मिळते. मागील बावीस दिवसात २३.७१ टक्क्यांवरुन हा दर १०.४४ टक्क्यांवर आला आहे.

म्हणजे १३.२७ टक्क्यांनी करोन‍ा लागण होण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ हजारांहून हळूहळु कमी होत ती १६ हजारांपर्यंत खाली आहे. एकूणच करोना लढ्यातले हे मोठे यश असून निर्बंधाचे पालन केल्यास पाॅझिटिव्हिटी दर आणखी खाली येण्याची चिन्हे आहेत.

पाॅझिटिव्ह दराचा खालावलेला आलेख

२ ते ८ मे

टेस्ट - १५४३०, पाॅझिटिव्ह - ३६७७, मृत्यू - ४१, डिस्चार्ज - ४३२८, अॅक्टिव्ह रुग्ण - ३४ हजार ६८१ पाॅझिटिव्हिटी रेट - २३.७१

९ ते १५ मे

टेस्ट - १३३६२, पाॅझिटिव्ह - २२०१, मृत्यू - ३५, डिस्चार्ज - ४१८२, अॅक्टिव्ह रुग्ण - २५ हजार ७७२, पाॅझिटिव्हिटी रेट - १७.५०

१६ ते २२ मे

टेस्ट - १४१०९, पाॅझिटिव्ह - १४४१, मृत्यू - ३८, डिस्चार्ज - १८४०, अॅक्टिव्ह रुग्ण - १७ हजार ६०५, पाॅझिटिव्हिटी रेट - १०.४४

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com